पुरंदर, १७ फेब्रुवरी २०२१: राख (ता.पुरंदर)येथील विकास सेवा सोसायटीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौशीची मागणी करत राख येथील सोसायटीच्या सभासदांनी आज मोर्चा काढून नीरा येथील जिल्हा बँकेच्या समोर आंदोलन केलं.
राख येथील विविध कार्यकारी सोसयटीचे चेअरमन व सचिव अनागोंदी कारभार करत आहेत. सोसायटीच्या सभासद फी चा अपहार केल्याचा व कर्ज माफित ही अफरा तफर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सोसायटी याबाबतची माहिती देत नाही. असाही त्याने म्हटलंय.
नीरा येथे आज दिनंक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता या सभासदांनी बुवासाहेब चौक ते जिल्हा बँके दरम्यान मोर्चा काढला. यानंतर बँके समोर ठीया आंदोलन केलं. यामध्ये चंद्रकांत रणनवरे, गजानन रणनवरे, सूर्यकांत रणनवरे, तानाजी रणनवरे,शिवाजी माने, सोमनाथ सुर्वे,गोरख पवार,मधुकर पवार, भरत रणनवरे इत्यादींनी सहभाग घेतला.
यावेळी सोसायटीने कर्जमाफी मर्जीतील लोकांना कर्ज मधित बसवले. तर विरोधक सभासदांना कर्ज माफित बसत असूनही कर्ज माफी पासून वंचित ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सोसायटीच्या गेल्या पाच वर्षातील कारभाराची चौकशीची मागणी आंदोलकांनी केली आहे. या सभासदांच्या आंदोलनाला आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी याबाबतचे एक निवेदन दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे