Asha Bhosale urges Devendra Fadnavis to sing at Radio Festival:
काल जागतिक संगीत दिनानिमित्त, महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने देशातील पहिला सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव २०२५ आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन केल होत.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते आशिष शेलार, जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पाच रेडिओ जॉकींनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली त्यावेळी फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
दरम्यान, महाविद्यालयीन काळात कविता, गाणी लिहिण्याचा छंद होता असं सांगत फडणवीसांनी म्हटलं की आपण एक गाणं रामावर तर दुसरं शंकरावर लिहिलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता देखील ऐकवून दाखवली. तसेच महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी देखील रेडिओ महोत्सवाच्या या कार्यक्रमात त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर “रेडिओची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणी दिसत जरी नसलं तरी सर्वकाही व्यक्त होते “अस फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना एक गाणं गाण्याचा आग्रह जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी केला. त्यांच्या आग्रहास्तव देवेंद्र फडणवीस यांनी ‘अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं….’ हे गाणं गायलं. त्यांनी गाणं गायल्यानंतर जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांचं कौतुक केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर














































