आशा भोसलेंनी दिला आठवणींना उजाळा, मी आणि दीदी म्हणत केला लहानपणीचा फोटो शेअर

मुंबई, 7 फेब्रुवारी 2022: स्वर कोकिळा मंगेशकर यांच्या निधनानं एका सुंदर युगाचा अंत झाला आहे. रविवारी लतादीदींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. लता मंगेशकर या जगात नसल्या तरी त्यांच्या आठवणी कायम आपल्या सर्वांच्या सोबत राहतील. प्रत्येकजण दुःखी आहे आणि ओल्या डोळ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. लता मंगेशकर यांची बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही लतादीदींची खास आठवण काढली आहे.

https://www.instagram.com/p/CZpNzl7NlOw/?utm_source=ig_web_button_share_sheet

आशा भोसलेंना आली दीदींची आठवण

आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचा बालपणीचा एक न पाहिलेला थ्रोबॅक फोटो शेअर करून लतादीदींची आठवण काढलीय. बालपणीच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोघी कॅमेऱ्याकडं बघत पोझ देत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरचा निरागसपणा दिसून येत आहे. या मिलियन डॉलर फोटोसह बालपणीचे दिवस आठवत, आशा भोसले यांनी कॅप्शन लिहिलं – बालपणीचेही दिवस काय होते. दीदी आणि मी असं कॅप्शन लिहीत त्यांनी हार्ट ईमोजी ही टाकलं आहे.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांच्यासोबत आशा भोसले यांच्या बालपणीच्या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि त्यांना या कठीण क्षणी खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत. युजर्स त्यांच्या आवडत्या लता मंगेशकर यांनाही मनापासून आठवत आहेत. एका यूजरने लिहिलं – मॅडम आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. लताजी आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत आणि नेहमी राहतील. दुसर्‍या यूजरने लिहिलं – याच कर आहेत आठवणी…. ज्या कायम आपल्या सोबतच राहतात. खूप सुंदर.

दुसरी लता मंगेशकर नसावी…

लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत यावर विश्वास बसणं कठीण आहे, पण हेच जीवनाचं वास्तव आहे. लताजी फक्त एक होत्या, त्यांच्यासारखी कोणीही नव्हती आणि कोणीही असणार नाही. गाणं कोकिळेच्या मृत्यूनंतर, प्रत्येक व्यक्तीनं एवढंच सांगितलं, लता मंगेशकर यांनी कठोर परिश्रम आणि अनेक संघर्षानंतर मिळवलेलं स्थान आणि प्रसिद्धी कोणालाही शक्य नाही. लता मंगेशकर या जगात नसल्या तरी लोकांच्या हृदयात त्या कायम जिवंत राहतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा