आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील ४५० मठाधिपतींना नोटीसा

पंढरपूर, दि.२ जून २०२०: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत शहरातील व ग्रामीण भागातील ४५० मठाधिपतींना नोटीसा काढल्यात आल्या आहेत. अशी माहिती उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर यांनी दिली आहे.

आषाढी यात्रा सोहळा एक महिन्यांवर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर व हद्द भागामध्ये असलेल्या सर्व लहान मोठे मठ, वारकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या खाजगी इमारती यांचे सर्वेक्षण केले आहे.

सद्यस्थितीत त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक व साधकांची नावे संकलित करण्यात आली आहेत.
सर्व लहान मोठे मठांचे व्यवस्थापक, वारक-यांना भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे.

राज्यातील व जिल्ह्यातील, परराज्यातून येणाऱ्या नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्व परवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाही. पूर्व परवानगीशिवाय नागरिक व साधकांना वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्र उप मुख्याधिकारी सुनील वाळुंजकर यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा