Lakhimpur Kheri Violence, 11 फेब्रुवारी 2022: लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला 124 दिवसांनंतर जामीन मिळालाय. लखीमपूर खेरीतील टिकुनिया येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्राला 9 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.
मात्र, आशिष मिश्राला तुरुंगातून बाहेर यायला एक-दोन दिवस लागू शकतात. आशिष मिश्रा याचे वकील अवधेश सिंह यांनी सांगितलं की, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केलाय, परंतु आदेश येणं बाकी आहे. आदेश आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं. यास एक किंवा दोन दिवस लागू शकतात.
आशिष मिश्राला का मिळाला जामीन?
- आशिष मिश्रा याचे वकील सलील श्रीवास्तव यांनी जामीन मिळण्यासाठी आधार दिला आहे. गाडी आशिष मिश्रा चालवत नसून हरी ओम मिश्रा चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि बचावासाठी ते गाडीवर चढले होते.
- ते म्हणाले की, चालकाच्या गुन्ह्यासाठी आशिष मिश्रा यांना कसं जबाबदार धरता येईल? लखीमपूर हिंसाचारात गोळी लागल्यानं एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.
- आरोपपत्रावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सर्वोच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेल्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या सह्या नाहीत. म्हणूनच आम्ही ते बेकायदेशीर मानतो.
आशिष मिश्रावर काय आरोप आहेत?
लखीमपूर हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या एसआयटीने 3 जानेवारीला 5000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये एसआयटीने आशिष मिश्रा याला ‘मुख्य आरोपी’ बनवलं होतं.
डिसेंबरमध्ये, एसआयटीने सांगितलं होतं की, आशिष मिश्रा ने सुनियोजित कट अंतर्गत 4 शेतकर्यांना त्याच्या कारने चिरडून ठार केलं होतं.
आशिष मिश्रावर हे 3 मोठे आरोप:-
- शस्त्रांचा वापर: एसआयटीच्या म्हणण्यानुसार, टिकुनिया गावातील हिंसाचाराच्या वेळी गोळ्या झाडण्यात आलेल्या गोळ्या आशिष मिश्रा आणि अंकित दास यांच्या परवानाधारक शस्त्रांच्या होत्या.
- मित्रांचा सहभाग : आशिष मिश्राशिवाय आणखी 13 जणांनाही आरोपी करण्यात आलंय. या सर्वांचा संबंध आशिष मिश्राशी होता. या हिंसाचारात अंकित दास आणि सुमित जैस्वाल यांचा सहभाग होता.
- घटनास्थळी उपस्थिती: वरिष्ठ अभियोग अधिकारी (एसपीओ) एसपी यादव यांनी सांगितलं की, केस डायरीतील साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे, घटनास्थळी आशिष मिश्रा उर्फ मोनूची उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे