MCA निवडणुकीतून आशिष शेलारांची माघार

मुंबई, १२ ऑक्टोंबर २०२२ : मुंबई क्रिकेट असोशिएशन अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या शर्यतीत रंगतदार लढतीची शक्यता होती. पण या निवडणुकीमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात युती झाली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून संदीप पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे शेलारांचा सामना माजी क्रिकेटपटू विरुद्ध असणार आहे. पण आत्ता शेलार या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आशीष शेलार भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI चे खजिनदार होणार असल्याने त्यांना MCA निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे.


लोढा समिती तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एका व्यक्तीला एकाचवेळी BCCI आणि स्थानिक संघटनेत वरिष्ठ पदावर राहता येत नाही. त्यामुळे आशीष शेलार हे MCA निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.


१८ ऑक्टोबर रोजी BCCI कार्यकारिणीची निवडणूक आहे. तर १४ ऑक्टोबरपर्यंत MCA निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत आहे.


दरम्यान, माजी क्रिकेकपटू संदीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरही आक्षेप घेण्यात आला होता. कॉन्फलिक्ट ऑफ इंट्रेस्ट नियमानुसार हा आक्षेप घेतला गेला होता. MCA निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला हे संदीप पाटील यांचे व्याही आहेत. त्यामुळे MCA चे सध्याचे सचिव संजय नाईक यांनी पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे.


पण निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यामुळे संदीप पाटील यांचे अध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतील स्थान वैध ठरले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर राजकीय वर्चस्व ठेवण्याची नेत्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे MCA च्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी युती केली आहे.

शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल एकत्रितपणे मैदानात उतरल्याने शेलार हेच MCA अध्यक्ष होतील, असं म्हटलं जात होतं. पण आता ते BCCI खजिनदार होण्याची शक्यता असल्याने MCA अध्यक्ष कोण? हा प्रश्न समोर आला आहे.

 

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा