अश्निनने इतिहास रचला, कसोटीत ४०० बळी पूर्ण…

अहमदाबाद, २६ फेब्रुवरी २०२१: टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण केले आहेत. अश्विन ४०० विकेट्स घेणारा जगातील दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पिंक बॉल टेस्टच्या दुसर्‍या दिवशी त्याने जोफ्रा आर्चर ला एलबीडब्ल्यू करत ही कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन आणि न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीने ८० कसोटीत ४०० बळी पूर्ण केले. तर अश्विनने ७७ व्या कसोटीत हा पराक्रम केला. या सामन्यापूर्वी अश्विनने ३९४ विकेट्स घेतल्या होत्या. श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने अवघ्या ७२ कसोटी सामन्यात विक्रमी ४०० विकेट्स पूर्ण केला.

कसोटीत ४०० बळी घेणारा ३४ वर्षीय अश्विन जगातील सहावा आणि भारताचा तिसरा फिरकीपटू आहे. भारतीय फिरकीपटूंमध्ये अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी ही कामगिरी केली आहे. अश्विन हा ४०० बळी घेणारा चौथा भारतीय गोलंदाज आहे. माजी कर्णधार कपिल देवने १३१ कसोटीत ४३४ बळी घेतले.

४०० किंवा अधिक बळी घेणारे फिरकीपटू –

१. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका): १३३ कसोटी – ८०० बळी

२. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया): १४५ कसोटी – ७०८ बळी

३. अनिल कुंबळे (भारत): १३२ कसोटी – ६१९ विकेट

४. रंगना हेरथ (श्रीलंका): ९३ कसोटी – ४३३ विकेट

५. हरभजन सिंग (भारत): १०३ कसोटी – ४१७ विकेट

६. रविचंद्रन अश्विन (भारत): ७७ कसोटी – ४००* विकेट

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा