नवी दिल्ली, १५ जुलै २०२० : एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची नियुक्ती केली आहे. १९८० बॅचचे उपाध्यक्ष म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी दिवाकर गुप्ता यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपेल. पुढे अशोक लवासा पदभार स्विकारतील. एडीबीने अशोक लवासांना खासगी क्षेत्रातील ऑपरेशन्स आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीसाठी उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँकेने सांगितले की, अशोक लवासा यांनी २३ जानेवारी २०१८ रोजी भारतीय निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. हरियाणा संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी (बॅच १९८०) निवृत्ती घेतली.
केंद्रीय वित्त सचिव,पर्यावरण मंत्रालय, वन व हवामान बदल तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाचे केंद्रीय सचिव होते.निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी लवासा यांनी सेवानिवृत्ती पर निवृत्ती घेतली.
न्यूज अनकट प्रतिनिधी