आशिया कप २०२५चा आजपासून रंगणार थरार…

आशिया कप २०२५ आजपासून म्हणजेच मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला जाणार आहे.

टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर रोजी युएई विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी असून त्यांना प्रत्येकी ४-४ अशा दोन गटांमध्ये विभागले आहे.

  • गट अ: भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान
  • गट ब: श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग

सर्वाधिक चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळला जाईल.


📅 आशिया कप २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक

९ सप्टेंबर – अफगाणिस्तान vs हाँगकाँग, अबू धाबी, रात्री ८:००
१० सप्टेंबर – युएई vs भारत, दुबई, रात्री ८:००
११ सप्टेंबर – बांगलादेश vs हाँगकाँग, अबू धाबी, रात्री ८:००
१२ सप्टेंबर – ओमान vs पाकिस्तान, दुबई, रात्री ८:००
१३ सप्टेंबर – बांगलादेश vs श्रीलंका, अबू धाबी, रात्री ८:००
१४ सप्टेंबर – भारत vs पाकिस्तान, दुबई, रात्री ८:००
१५ सप्टेंबर – युएई vs ओमान, अबू धाबी, संध्याकाळी ५:३०
१५ सप्टेंबर – हाँगकाँग vs श्रीलंका, दुबई, रात्री ८:००
१६ सप्टेंबर – अफगाणिस्तान vs बांगलादेश, अबू धाबी, रात्री ८:००
१७ सप्टेंबर – युएई vs पाकिस्तान, दुबई, रात्री ८:००
१८ सप्टेंबर – अफगाणिस्तान vs श्रीलंका, अबू धाबी, रात्री ८:००
१९ सप्टेंबर – भारत vs ओमान, अबू धाबी, रात्री ८:००

सुपर ४ फेरी:
२० सप्टेंबर – बी१ vs बी२, दुबई, रात्री ८:००
२१ सप्टेंबर – ए१ vs ए२, दुबई, रात्री ८:००
२३ सप्टेंबर – ए२ vs बी१, अबू धाबी, रात्री ८:००
२४ सप्टेंबर – ए१ vs बी२, दुबई, रात्री ८:००
२५ सप्टेंबर – ए२ vs बी२, दुबई, रात्री ८:००
२६ सप्टेंबर – ए१ vs बी१, दुबई, रात्री ८:००

२८ सप्टेंबर – अंतिम सामना: फायनलिस्ट १ vs फायनलिस्ट २, दुबई, रात्री ८:००


👉 न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड