गोल पोस्ट गुन्हा नाशिक येथे पूर्व वैमानस्यातून एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक येथे पूर्व वैमानस्यातून एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक, दि.१० मे २०२०: देवळाली कॅम्प परिसरात असणाऱ्या हडोळा इथं पूर्ववैमनस्यातून डॉ आंबेडकर सोसायटीत राहणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते विलास पवार यांचा मुलगा बिट्टू पवार याच्यावर शनिवारी( दि.९) रोजी रात्री उशिरा काही जणांनी येऊन गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारात बिट्टू पवार जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकरोडच्या जयराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

हल्लेखोर आणि जखमी यांच्यात पूर्वीचे वाद होते. शनिवारी रात्री पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले आणि हल्लेखोरांनी बिट्टू पवार याच्यावर गोळ्या झाडल्या.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत तात्काळ ४ आरोपीना अटक केली आहे. सर्व आरोपी हे हडोळा येथेच राहणारे असून मुख्य आरोपी सनी कदम याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेकदा त्याला पोलिसांनी तडीपार देखील केले आहे. तर यात जखमी झालेला बिट्टू पवार आणि शवलीन पवार यांच्यावर सुद्धा आधीचे २ गुन्हे दाखल आहेत.
एकूणच शहरात संचारबंदी उठवल्याने पुन्हा गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. सलग तीन रात्रीत तीन गुन्हे उघडकीस आले असल्याने कोरोना बरोबरच आता शहरात रात्री पहारा देणे हे पोलिसां समोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version