गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा महिलेला मारहाण, पतीसह सासू व दीराविरोधात गुन्हा

महिलेला मारहाण, पतीसह सासू व दीराविरोधात गुन्हा

बारामती, ९ ऑक्टोबर २०२०: घरात सतत टीव्ही बघण्यावरून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू व दिराच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलका युवराज शेळके (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे .त्याप्रमाणे पती युवराज सदाशिव शेळके, सासू रंजना सदाशिव शेळके व दीर संदीप सदाशिव शेळके या तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मागील महिन्यात २१ सप्टेंबर रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार अलका या घटनेदिवशी भांडी घासून घरात टीव्ही बघत बसल्या असताना तिच्या पतीने तु कोणतेही काम करत नाही, आणि दिवस भर फक्त टीव्ही बघत असते, असे म्हणत खोऱ्याचा दांडा घेऊन डोक्यात मारून शिविगाळ केली. तसेच सासू व दीर यांनी शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गोंधळ एकुण शेजारील लोकांनी तिची सुटका केली. डोक्यातून रक्त येत असल्याने सुरुवातीला काटेवाडीत उपचार घेत फिर्य़ादी तिच्या माहेरी गेली आहे. घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर दि. ८ रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्य़ाद देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version