माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयास तंत्रशिक्षण परिषदेची मदत

बारामती, दि.१९ मे २०२०: माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय सन १९९० पासून कार्यरत आहे. त्याद्वारे दर्जेदार तंत्रशिक्षण ग्रामीण भागातील मुलांसाठी उपलब्ध झाले आहे. नुकतेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील प्रयोगशाळा
आधुनिकीकरणासाठी सुमारे दहा लाख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.

माळेगाव येथील कॉलेजच्या आधुनिकीकरणासाठी ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रस्ताव मागवले होते. या प्रस्तावाचे गुणवत्तापूर्ण परीक्षण पूर्ण करून सदरची आर्थिक मदत मिळालेल्या निवडक अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.

या प्रस्तावाचे समन्वयक सिव्हिल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. गुणवंत काटे हे आहेत. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड या बाबतीतही माळेगाव अभियांत्रिकी
महाविद्यालय अग्रेसर आहे.
चालू शैक्षणिक वर्षांमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांपैकी एकुण १५७ विद्यार्थ्यांची निवड आतापर्यंत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट आॅफिसर प्राध्यापक डॉ. माधव राऊळ यांनी दिली.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे, प्राध्यापक डॉ. गुणवंत काटे व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन
संस्थेचे उपाध्यक्ष, विश्वस्त व सचिव यांनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा