सोलापूर, दि.७मे २०२० : सोलापुर शहरातील एकता नगर परिसरात राहणाऱ्या ५७ वर्षाच्या सहायक फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी ( दि.६)रोजी दिवसभरात सोलापुरात कोरोनाचे ८ नवीन रुग्ण सापडले असून सोलापुरातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या १५३ वर पोहोचली आहे.अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापुरातील मृतांमध्ये सदर बाझार लष्कर परिसरातील दोन पुरुष, साईबाबा चौकातील एक पुरुष, आज मयत झालेला एकता नगर परिसरातील एक पुरुष, मोदी परिसरातील दोन पुरुष, राजीव गांधी झोपडपट्टीतील एक पुरुष व सिद्धेश्वर पेठेतील एक पुरुष अशा आठ जणांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० वर गेलेली आहे.
रुग्णालयात उपचार घेऊन कोरोना वर मात केलेले २४ जण असून उर्वरित ११९ जणांवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात कोरोनाचे १९७ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. अद्यापही २६४ जणांचे अहवाल मिळणे बाकी आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनिधी: