फलटण तालुक्यातील बरड पोलीस स्टेशनचे नवे कारभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट

फलटण, सातारा ९ ऑगस्ट २०२३ : बरड पोलीस स्टेशनचे कर्तुत्वान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांची लोणंद येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट यांची नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी बरड पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला असून ते बरड पोलीस स्टेशनच्या सेवेत दाखल झाले आहेत.

बरड पोलीस स्टेशन हे महत्त्वाचे पोलीस ठाणे असून फलटण पूर्व भागातील जनतेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पोलीस ठाणे कार्यरत असते. या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम ही राबवले जातात. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, याच मार्गावरून जात असतो आणि सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम उरकून हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असतो. तेव्हा बरड पोलीस स्टेशनची महत्त्वाची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी हे पोलीस स्टेशन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत आले आहे.

बरड पोलीस स्टेशनला यापूर्वी अक्षय सोनवणे, बोंबले साहेब व सुशील भोसले या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पडली असून बरड पोलीस स्टेशनचा नावलौकिक वाढवला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांची लोणंद तालुका खंडाळा येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट यांची नियुक्ती झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा