खगोलप्रेमींनो आजचा दिवस सोडू नका……

1

पुणे, २१ डिसेंबर २०२०: यंदाचं २०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी वाईट गेलं असलं तरी खगोल प्रेमींसाठी मात्र काही अंशी चांगलं आहे. या सरतेवर्षाच्या शेवटी काही विलोभनीय आणि अद्भूतरम्य दृश्य आज अनुभवायला मिळणार आहेत.

संध्याकाळी सात वाजता गुरु आणि शनिची महायुती पाहयला मिळणार आहे.२०२० मधील सर्वात अद्भूत आणि मोठी खगोलीय घटना आज घडणार आहे. खगोल प्रेमींसाठी हि एक महत्त्वापुर्ण आणि अद्भूत नजराना आसणार आहे. जवळपास ८०० वर्षानंतर गुरू आणि शनिची महायुती होणार असून या अगोदर १६२३ साली हे दोन ग्रह एकत्र आले होते. तर या वेळी दोन्ही ग्रहांमधील अंतर ०.१ अंशावर येणार आहे.

आजचा दिवस लहान तर रात्र मोठी….

आज उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस तर सर्वात मोठी रात्र आसते. आज रात्री आकाशात शनी व गुरू या दोन महाकाय ग्रहांची युती होईल.या ग्रहांच्या कक्षामधे ६५ कोटी किलोमीटर चे अंतर आहे. पण, कक्षेत फिरण्याची गती व आपल्या दृष्टीने त्यांचा बदललेला कोन यामुळेच दोन्ही ग्रह एकत्र आल्यासारखे भासतील. शनि व गुरूची युती दर २० वर्षांनी होते या पुढे असे ३१ ऑक्टोबर २०४० ला घडणा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा