उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने आसूड सत्याग्रह

उदगीर, २२ फेब्रुवारी २०२३ : उदगीरमध्ये काल बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे विविध मागण्यांसाठी आसूड सत्याग्रह करण्यात आला त्यात शंभर कोटी गौण खनिज उत्खनन घोटाळ्याची चौकशी करावी, अवैधरित्या उदगीरमध्ये वाळू वाहतूक होत आहे. अवैधरित्या उदगीरमध्ये वाळू वाहतूक होत आहे. ती वाळू वाहतूक गेल्या तीन वर्षापासून तहसील कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून होत आहे. शासनाची रॉयल्टी चुकवून ही वाळू वाहतूक होत असताना बघायची भूमिका घेणारे कर्मचारी,अधिकारी करोडो रुपयाचे मालक बनले आहेत. शासनाची नोकरी करायची आणि भाकरी मात्र नियम बाह्य वाळू वाहतूक नियमबाह्य गौण खनिज उत्खनन यांची चाकरी करायची. हा प्रकार बंद करा, गायरान जमिनीवर कृषी परवाना नसताना प्लॉटिंग कोणत्या नियमाने टाकली?, जनतेची फसवणूक करणाऱ्या भू माफियायावर व बघायची भूमिका घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा,अशा मागण्यासाठी प्रचंड आसूड सत्याग्रह करण्यात आले.

यावेळी स्वतःवर कोडे मारून घेऊन शासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनाची दखल घेऊन स्वतः उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले व तात्काळ कारवाई करून आंदोलकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजय कुमार ,प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड, जिल्हाध्यक्ष नर्सिंग गुरमे, लक्ष्मण आडे ,अमोल सूर्यवंशी ,आकाश पाटील ,रावण भोसले, रवी डोंगरे, शिंदे, गोरख, वाघमारे, जावेद शेख, शाम कांबळे, सय्यद चांद साब, राजकुमार कारभारी दिलीप वासरे इत्यादी अभियानाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा