गोल पोस्ट गुन्हा जळगाव येथे भररस्त्यावर व्यापाऱ्याला आठ लाखांना लुटले; खेडीपर्यंत गेल्यानंतर चोरट्यांनी मोबाईल केला...

जळगाव येथे भररस्त्यावर व्यापाऱ्याला आठ लाखांना लुटले; खेडीपर्यंत गेल्यानंतर चोरट्यांनी मोबाईल केला बंद

पुणे, २४ जानेवारी २०२३ : दुकानातील दिवसभर झालेले पैसे घेऊन घराकडे निघालेल्या ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी, जळगाव) या ड्रायफ्रूट व्यापाऱ्याची आठ लाख रुपये असलेली बॅग दबा धरून बसलेल्या तिघ चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पांडे चौक परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ घडली. रात्री घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली. त्यानंतर चोरट्यांच्या शोधार्थ पथक रवाना झाले होते.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील ईश्वर मेघाणी हे ड्रायफ्रूटचे व्यापारी आहेत. बँकेत भरणा करण्यासाठी सोमवारी त्यांनी आठ लाख रुपयांची रक्कम बॅगेत ठेवली होती; पण बँकेत भरणा न करता आल्यामुळे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते पैशांची बॅग घेऊन घराकडे दुचाकीने निघाले होते. राधाकृष्ण मंगल कार्यालायाजवळील गणेश कॉलनीकडे वळण घेत असताना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या तिघा चोरट्यांनी मेघाणी यांच्या दुचाकीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवर असलेल्या दुसऱ्या चोरट्यासोबत पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत यांच्यासह जिल्हापेठ, एमआयडीसी आणि एलसीबीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मेघाणी यांनी घडलेली घटनेची संपूर्ण हकिगत पोलिसांसमोर कथन केकी. त्यानुसार पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. यासोबत चोरटे कोणत्या दिशेने आले व गेले याचाही तपास पोलिस करीत होते. तर सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी तपासले.

बॅग घेऊन चोरटे दोन दुचाकींवर पसार झाले. दरम्यान, मेघाणी यांच्या मागून घराकडे जात असलेले अमर कारडा यांनी चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला; परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, मेघाणी यांच्या बॅगेत आठ लाख रुपये, मोबाईल व लॅपटॉप होते. चोरटे खेडी गावापर्यंत गेल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद करून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version