कमीत कमी दहा ते बारा लोकांचा वादळामुळे मृत्यू : ममता बॅनर्जी

कोलकत्ता, दि. २१ मे २०२०: अम्फान वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये विनाश झाला आहे. दोन्ही राज्यात डझनाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस आणि वादळी वार्‍याने दोन्ही राज्ये हादरली. गेल्या अनेक वर्षांत कोणीही असा विनाश पाहिला किंवा ऐकला नव्हता . वाऱ्याचा वेग इतका होता की जमिनीवरील सर्व गोष्टी हे वादळ वाहून नेते की काय असे वाटत होते.

काही तासातच या चक्रीवादळाने ओडिशा आणि बंगाल मध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण केली. अद्यापही चक्रीवादळ चालूच आहे. कोलकत्ता मध्ये या चक्रीवादळाने सर्व अस्ताव्यस्त करून टाकले आहे. शहरात सर्वत्र गुडघाभर पाणी झाले आहे. वाहने आणि इतर वस्तू पाण्यावर नावेप्रमाणे तरंगत आहेत. रस्त्यावरील झाडे, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. शहरातील विद्युत प्रवाह देखील काही ठिकाणी खंडित झाला आहे तसेच रस्त्यांमध्ये झाडे पडून देखील अडथळे निर्माण झाले आहेत.

शहरातील हावडा ब्रिज देखील या वादळाच्या तडाख्यात आला. वाऱ्यामुळे पुल दिसणे देखील बंद झाले होते. या चक्रीवादळामध्ये कोलकत्त्या मधील एका शाळेचे छत देखील बघता बघता उडून गेले.

मदत व बचाव कार्य चालू आहे

बंगालमध्ये बर्‍याच ठिकाणी विध्वंस झाल्याचे दृश्य आहे, वादळ संपल्यानंतर त्याचा सर्वत्र खोलवर परिणाम झाला आहे. मदत पथक रस्त्यांवरील तुटलेली झाडे हटविण्याचा काम करीत आहेत, पण काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाहीत. रस्ते भरल्यामुळे मदतकार्य अधिक अवघड होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा