यवतमाळच्या आनंदनगर महागावात पुराच्या पाण्यात ८० लोक अडकले, हेलिकॉप्टरने थरारक रेस्क्यू ऑपरेशन

यवतमाळ, २२ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर अतिशय भयानक परिस्थिती आहे. जिल्ह्यातील वाघाडी गावात पूर आला आहे.तसेच यवतमाळच्या आनंदनगर महागावात पुराच्या पाण्यात ८० लोक अडकले आहेत. त्यानंतर आता हवाईदलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले आहे. हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर हवेत घिरट्या मारत आहेत. तर एक हेलिकॉप्टर हायवेवर खडगा गावात उतरले आहे.

यवतमाळच्या बेंबळा धरणाचे १० दरवाचे उघडले आहेत. तसेच जिल्ह्यातील पूस नदीला पूर आला आहे. त्यामुळे महागावाला पुराचा वेढा बघायला मिळत आहे. गावातील तब्बल ८० गावकरी अडकले आहेत. या अडकलेल्या नागरिकांमध्ये लहान मुले, महिलांचा समावेश आहे. गावकऱ्यांचे सुरुवातीला तेथे असलेल्या छोट्या रस्त्याने रेस्क्यू केले जात होते. नंतर या गावकऱ्यांचे हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू केले जात आहे.

पूस नदीला मोठा पूर आल्याने अनेक घरात पाणी शिरले आहे. घरात राहणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आपले घर-दार, गाव जागेवर सोडून सुरक्षित स्थळी जावे लागत आहे. अनंदनगर महागाव हे पूस नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. तिथे सर्व गावकरी अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाघाडी आणि पैनगंगा नदीला देखील पूर आला आहे.

हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यामातून सर्व गावकऱ्यांचे रेस्क्यू केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यवतमाळमध्ये आज जवळपास २४० मिमी पाऊस पडला. वेगवेगळ्या तालुक्यातून ५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पुराच्या पाण्याच अडकलेल्या २०० नागरिकांना जिल्हा पथक आणि एसडीआरएफच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू केले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.आता आनंदरच्या नागरिकांचे हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू केले जात आहे. पूस आणि पैनगंगा नदीचा तिथे संगम आहे. तसेच तिथे एक नाला आहे. तेथील काही नागरीक आमच्या संपर्कात आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, महागाव येथे हेलिकॉप्टर पोहोचले आहे. हे हेलिकॉप्टर गावाच्या वरती घिरट्या घालत आहेत. गावात किती लोक आहेत याचा अंदाज घेतला जात आहे. त्यानंतर एक व्युव्हरचना आखून लगेच सर्व जणांचे रेस्क्यू केले जाणार आहे.गावकऱ्यांना घराच्या छतावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेथून त्यांना रेस्क्यू केले जाणार आहे. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर हवेत घिरट्या मारत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा