आता जम्मू-काश्मीर आणि लडाख झाला केंद्रशासित प्रदेश

आजपासून (दि. 31) जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत.

त्यामुळे देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 होणार असून राज्यांची संख्या 29 वरून 28 होणार आहे.

होणारे बदल

● काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात येणार आहे.
● भारतातील कुणीही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन मतदानही करू शकतो आणि उमेदवारही होऊ शकतो.
● भारतीयांना काश्मीरमधील संपत्ती खरेदी करण्याचा आणि गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
● आता येथील वेगळी राज्यघटना संपुष्टात येणार आहे.
● काश्मीरचा स्वतंत्र झेंडाही रद्द होणार आहे. (तिरंगा फडकावला जाणार)
● जम्मू काश्मीरमध्येच विधानसभा असेल तर लडाखमध्ये विधानसभा नसणार आहे.
● न्यायव्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही.
● केंद्राचे सर्व कायदे या ठिकाणी आता लागू होणार आहे.
● कोणताही भारतीय नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी करू शकतो
● राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे
● भारतीय संसद यापुढे काश्मीरसाठीही सर्वोच्च असणार आहे.
● जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार कायदा, सीजीए लागू होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा