आता रेशन दुकानांवर चिकन, मटण मिळणार

मुंबई : रेशन दुकानातून अन्नधान्यांबरोबरच आता स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील उपलब्ध करण्याचा विचार सरकार करत आहे. याविषयी लवकरच प्रस्ताव काढण्यात येणार आहे.
अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून आता पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देणार आहे. गरिबांना पोषण आहार सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावा, हा यामागे उद्देश आहे.
सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात.
अन्नधान्य अनुदानापोटी सरकारला मोठी तरतुद करावी लागते.
सुरवातीच्या टप्प्यात प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थांमध्ये मटण, अंडी, मच्छी आणि चिकन या खाद्यवस्तू रेशनवर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
पोषण सुरक्षेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नीती आयोगाकडून ही योजना तयार केली जात आहे. हे व्हिजन डाक्युमेंट १ एप्रिल २०२० पासून लागू केले जाईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा