आता सरकारी नोकरीसाठी द्यावी लागणार सीईटी!

मुंबई : केंद्र सरकारमधील ‘ब’ आणि ‘क’ प्रवर्गातील पदभरती आता गुणवत्तेनुसार होणार आहेत. ही पदे ‘सीईटी’ परीक्षेद्वारे भरण्याच्या केंद्र सरकार विचार करीत आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार ‘क’ प्रवर्गातील ५ लाख ७४ हजार २८९ तर ‘ब’ प्रवर्गातील ८९ हजार ६३८ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची निवड ही सीईटीद्वारे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. ही परीक्षा घेण्यासाठी विशेष एजन्सीची नेमणूकही करण्यात येणार आहे.

सीईटी घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष एजन्सीने केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी तांत्रिक पदे भरण्यासाठी सीईटी परीक्षा घ्यायची आहे.
सध्या या पदांवरील भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), रिजनल रूरल बॅक (आरआरबी) आणि इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) च्या माध्यमातून होत आहे. या प्रस्तावावर लवकरच देशातील नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा