आंध्र चेकपोस्ट येथे प्रचंड प्रमाणात गोमांस जप्त

13

श्रीकाकुलम (आंध्र प्रदरेश) २१ जून २०२० : पुरुषोत्तमपुरम चौकी येथून रविवारी पोलिसांनी एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गोमांस ताब्यात घेतले आहे . यावेळी दोन वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत बोलताना ईच्छापुरमचे उपनिरीक्षक सत्यनारायण म्हणाले की, ओडिशाच्या बेहरामपुरमधील बजरंग दलाच्या माहितीवरून पोलिसांनी २६००० किलोग्रॅम गोमांस असलेले कंटेनर ट्रक रोखला.

ते म्हणाले की, ‘’ आम्हाला एक फोन आला आणि त्यानुसार सकाळच्या सुमारास आम्ही गाडीवर छापा टाकून गोमांस जप्त केले.

कंटेनर ट्रकमध्ये गोमांसचे १३०० पॅकेट होते, प्रत्येकाचे वजन २० किलोग्रॅम होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दोन वाहनचालकांना ताब्यात घेत कंटेनर व त्यातील सामग्री जप्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी