गोल पोस्ट राष्ट्रीय एटीएसने रत्नागिरीतून केली एकाला अटक, पुण्यात पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा...

एटीएसने रत्नागिरीतून केली एकाला अटक, पुण्यात पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप

पुणे, २९ जुलै २०२३: राज्य दहशतवाद विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातून एकाला अटक केली. कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी या दोन्ही दहशतवाद्यांना कोंढव्यात निवासस्थान मिळवून दिल्याचा आरोपावरून आणि दोन्ही दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अब्दुल कादीर दस्तगीर पठाण याला अटक केल्यानंतर आता आणखी एकाला रत्नागिरीतून एटीएसच्या पथकाने अटक केली आहे.

त्यांच्यावर या दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत एटीएसने दोन दहशतवादी आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून इतर राज्यात देखील या दोन्ही दहशतवाद्यांच्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version