भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांच्या गाडीवर हल्ला , स्टंट की राजकारण

सोलापूर १ जुलै २०२१: भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात एका अज्ञाताने हल्ला केला. सोलापूरातल्या मड्डी वस्तीत हा हल्ला झाला असून हा हल्ला राष्ट्रवादीने करवला असल्याचा पडळकरांचा संशय आहे. ज्याने हल्ला केला , त्याने पळून जाताना शरद पवारांच्या नावाच्या घोषणा केल्या.
त्यामुळे यातून राष्ट्रवादीचा खरा गुंड चेहरा समोर आला असल्याची प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ओबीसीला भाजपमध्ये मानाचं स्थान आहे. मात्र महाविकास आघाडीत ओबीसीला कुठलचं स्थान नाही. ओबीसी आणि मराठा ही दोन्ही आरक्षण महाविकास आघाडीमुळे रद्द झाली. यांचे कारण महाविकास आघाडिचे मार्गदर्शक हे शरद पवार आहे. त्यामुळे भाजपवर टीका आणि आघाडीत राजकारण हे होणारच, असं स्पष्ट मत पडळकर यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, मी मुद्दयांवर बोलतो. खरे बोलतो. मी कोणालाही बोलत नाही. लोकांच्या प्रश्नांसंदर्भात बोलतो. म्हणून लोकांना माझा राग येतो. म्हणून माझ्या बाबतीत असे हल्ले होतात. मात्र राष्ट्रवादी कधीच मुद्दयांवर बोलत नाही. त्यामुळे अशा घटना त्यांच्याबरोबर घडत नाही. अशा शब्दात पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.
न्युज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा