वारजे माळवाडी परिसरात तिघांवर हल्ला

हडपसर, दि. ३ ऑगस्ट २०२० : पुण्यातील वारजे माळवाडी येथे कोयता गँगच्या चार जणांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. त्यांनी नागरिकांमध्ये दहशत पसरवत तिघांना बेदम मारहाण केली आहे. यामध्ये एका डिलेव्हरी बॉयवर कोयत्याने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यातील आरोपी हे १९ ते २४ वयोगटातील असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी रोहित सावळाराम पोटे २३, रा. कर्वेनगर यांनी फिर्याद दिली आहे. नितीन लक्ष्मण पदमाकर २०, रा. रामनगर, वारजे, महादेव प्रल्हाद जावळे २४,रा. रामनगर, वारजे, मयूर सुरेश कुडले १९, कॅनॉल रोड, वारजे आणि अनिल गुरुनाथ सासवे रा.रामनगर, वारजे अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी रोहित हा एका कंपनीत डिलेव्हरी बॉयचे काम करतो. संध्याकाळी कोयता गँगने या परिसरात दहशत पसरवत तिघांवर हल्ला केला. अधिक तपास पोलीस करता आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा