गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा बीड शहरात तिघांवर हल्ला ; गंभीर जखमी

बीड शहरात तिघांवर हल्ला ; गंभीर जखमी

बीड, दि.१९ मे २०२० : बीड शहरातील मोमीनपुरा भागातील पुलावर अज्ञात चौघांनी किरकोळ कारणावरून तिघांवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.१८) रात्री आठच्या सुमारास घडली.

या हल्ल्यात शेख अामेर अनिस ( वय २८ ) , शेख शकील कट्टु ( वय ३० ) आणि शेख अहेमद कट्टु तिघे रा. मोमीनपुरा ,बीड हे जखमी झाले आहेत. यामध्ये अामेरच्या डोक्यावर गंभीर वार अाहे.

शकीलच्या पायावर वस्तरा मारलेला अाहे तर अहमदच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पेठ बीड पोलीस दाखल झाले होते. हल्ल्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version