फ्रान्स मध्ये हल्ले सुरूच, लिओन शहरात एका चर्च पादरिवर हल्ला

लिओन (फ्रान्स), १ नोव्हेंबर २०२०: शनिवारी फ्रान्समधील लिओन शहरात एका चर्च पादरिवर हल्ला करण्यात आला. पादरीवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सायंकाळी चारच्या सुमारास पादरीवर दोनदा फायारिंग करण्यात आली. जेव्हा तो चर्च बंद करत होता तेव्हा हा हल्ला झाला. जखमी पादरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात फ्रान्सच्या नाइस शहरातील चर्चमध्ये एका महिलेसह तीन जणांची हत्या झाली होती. हल्लेखोरांनी महिलेचा गळा कापला. चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक प्रार्थना करण्यात व्यस्त असताना हा हल्ला झाला. पैगंबर मोहम्मद यांच्या कार्टूनवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये हा हल्ला झाला.

यापूर्वी पॅरिसच्या उपनगरी भागात शिक्षकाचा खून झाला होता. पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवल्यामुळे शिक्षकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले.

या टिप्पणीनंतर राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉनचा तीव्र विरोध होत आहे. भारतातही बर्‍याच ठिकाणी फ्रेंच राष्ट्रपतींच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या सर्वांच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी नाइसच्या चर्चमधील हल्ल्याचा निषेध केला.

फ्रान्समधील व्यंगचित्र वादावर पंतप्रधान मोदींनीही निवेदन दिले. ते म्हणाले की आजच्या वातावरणात जगातील सर्व देशांनी, सर्व सरकारांनी, सर्व पंथांनी दहशतवादाविरोधात एकवटण्याची गरज आहे. शांतता, बंधुता आणि परस्पर आदर यांची भावना ही मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद-हिंसाचाराचा कोणालाही कधीही फायदा होऊ शकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा