एफआरपी’च्या रकमेसाठी ‘स्वाभिमानी’ तालुकाध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सोलापूर, ९ ऑक्टोबर २०२० : आज शुक्रवार दि.९ श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीप्रतिपादनाचा कार्यक्रम सुरू असताना स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास बाबर यांनी सभासदांना उसाची एफआरपी रक्कम का दिली जात नाही अशी विचारणा करत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी सोलापूरच्या पोलीस उपायुक्त वैशाली पाटील यांनी पुढं येत बाबर यांना अडवलं व पुढील अनर्थ टळला.

छत्रपती साखर कारखान्याचा आज बॉयलर अग्नीप्रतिपादनाचा कार्यक्रम सोलापूरच्या पोलीस उपायुक्त वैशाली पाटील व उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते पूजा होम हवन सुरू असताना स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास बाबर यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदाहनाचा प्रयत्न केला. आठ दिवसात एफआरपी’ची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा झाली नाही तर स्वाभिमानी संघटना कारखान्याच्या चेअरमन व सभासदांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. तर एफआरपी’ची रक्कम सभासदांना देऊ नये असं कोणी सांगितलं आहे का, कारखान्याचे चेअरमन सभासद यांच्या निष्क्रिय कामकाजामुळं सभासदांना हे दिवस आले आहेत.

स्वाभिमानी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांचा आम्हाला आदेश होता. राज्यात जोपर्यंत शेतकरी स्वाभिमानी संघटनेची ऊस परिषद होत नाही तो पर्यंत आम्ही राज्यातील कोणत्याही कारखान्यांचा बॉयलर पेटू देणार नाही तर छत्रपती कारखान्यानं एफआरपी चे ४०० रुपये सभासदांच्या खात्यावर आठ दिवसात जमा करावे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा