व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्याचा मार्ग अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न, अनेकांना अटक

मॉस्को, १६ सप्टेंबर २०२२: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे, मात्र ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. ते घराजवळ आले असता त्यांच्या ताफ्याचा मार्ग अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असली तरी त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय.


पुतीन यांच्यावर एवढा प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये त्यांनी स्वतःच ५ प्राणघातक हल्ल्यांमध्ये आपला जीव कसा वाचला याची माहिती दिली होती.

युरोवीकलीच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कारच्या पुढील डाव्या चाकाला जोरदार धडक बसली. ते त्यांच्या घरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होते, तेव्हा एका रुग्णवाहिकेने त्यांना संरक्षण देत असलेल्या कारचा रस्ता अडवला. तर अचानक आलेल्या अडथळ्यामुळं सुरक्षेची दुसरी गाडी निकामी झाली.


रशियात प्रसारमाध्यमांवर बारीक नजर असली तरी पुतिन यांच्यावर हा हल्ला केव्हा झाला हे स्पष्ट झालेले नाही. परंतु युरोवीकली च्या म्हणण्यानुसार की पुतिन यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वाढत आहे, म्हणून ते डिकोय मोटारकेडमध्ये प्रवास करतात.


सुरक्षा रक्षकाला अटक


राष्ट्रपतींच्या सुरक्षेत गुंतलेल्या अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आतील सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर काहींना अटकही करण्यात आलीय, कारण फार कमी लोकांना राष्ट्रपतींच्या हालचालींची माहिती आहे. तथापि, या दाव्यांची पुष्टी होणं बाकी आहे.


SCO मध्ये PM मोदींची भेट घेणार


दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन समरकंदच्या दौऱ्यावर जात आहेत. येथे ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत सहभागी होतील. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांचीही भेट घेणार आहेत.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे