पुणे, २९ ऑगस्ट २०२०: सध्या देशामध्ये पुणे शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट शहर म्हणून ठरलं आहे. त्यातल्या त्यात पुण्यातील पेठा सर्वात जास्त प्रभावित आहेत. परंतू अशा गंभीर परिस्थीत देखील काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोकं याचा फायदा घेत आहे. अशीच घटना काल पुण्यातील रविवार पेठेत समोर आली आहे. कोरोना कर्मचारी आहोत असं सांगून सहा ते सात जणांचा समूह दरोडा टाकण्याच्या हेतूनं घरो घरी फिरत होता. एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात ही टोळी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होती. सुदैवानं पुढील होणारा प्रकार टाळला.
श्रीकांत विठोबा विल्लंपल्ली हे गृहस्थ रविवार पेठेतील रहिवासी आहेत. कोरोनाची माहिती घेण्यासाठी आलो आहोत असं सांगत एक पुरुष आणि दोन महिला श्रीकांत यांच्या घरात शिरल्या. घरात शिरताच त्यांनी श्रीकांत यांचं तोंड रुमालानं दाबलं. यानंतर श्रीकांत यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून शेजारील लोकं धावून आले आणि सदर सर्व प्रकार उघडकीस आला.
संबंधित गुन्हेगाराकडं एक पिस्तुल देखील सापडलं आहे. यामध्ये ६-७ जण सहभागी होते. सध्या या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर बाकीचे ४-५ जण पळून गेले आहेत. या टोळीनं इंडिका चारचाकी वाहनाचा वापर केला होता. सदर गाडी देखील पुण्यातली आहे. एम एच १२ एम आर ००९३ असा या गाडीचा नंबर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी