झारखंड, दि. ३० मे २०२०: झारखंडमधील रिम्स हॉस्पिटलमधून एक लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. जेथे एका वरिष्ठ डॉक्टरने कनिष्ठ महिला डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न केला. कनिष्ठ महिला डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बिराटू पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपी डॉक्टर सध्या फरार आहे. पोलिस त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलिसांच्या अटकेपासून आरोपी फरार
राज्यातील सर्वात मोठ्या रिम्स या रूग्णालयात, ज्युनियर डॉक्टर वर रात्री उशिरा तिच्या सीनियर डॉक्टर कडून बलात्काराचा प्रयत्न केला गेला. एनेस्थिसिया विभागाची जूनियर डॉक्टर रात्री रिम्सच्या कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होती, त्यावेळी क्रिटिकल केअरचा एक वरिष्ठ डॉक्टरही तेथे ड्यूटीवर होता.
२७-२८ मे रोजी रात्री कर्तव्य बजावताना तिच्यावर बलात्कार करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचा आरोप या महिला डॉक्टरने केला आहे. पीडित महिला डॉक्टरांनी प्रथम याची माहिती रिम्सचे संचालक डॉ. डी के सिंह यांना दिली.
डॉ. डी के सिंह यांनी सांगितले की, पीडित डॉक्टर कोविड वॉर्डमध्ये काम करीत होत्या आणि त्यांनी लेखी तक्रार दिली आहे. नियमानुसार आरोपींवर कारवाई केली जाईल, असहीे ते म्हणाले. याशिवाय पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी सिटी एसपी सौरभ कुमार यांनी सांगितले आहे की त्वरित कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी डॉक्टरच्या अटकेसाठी सातत्याने छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा कलम ३७६ लावला आहे. तसेच पीडितेचे १६४ नुसार विधान नोंदवले गेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी