जम्मू, २९ जून २०२१: जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्यानंतर आता जम्मूमध्येच कालूचक मिलिटरी स्टेशनवर २ ड्रोन दिसले आहेत. त्यांना खाली पाडण्यासाठी सैन्यानं गोळीबार केला, पण ते अंधारात गायब झाले. लष्करानं संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केलीय. डीडी न्यूजच्या वृत्तानुसार, रविवारी रात्री ११.३० आणि पहाटे १.३० वाजता सैन्य तळावर अनमॅन एरियल वेहिकल (यूएव्ही) निदर्शनास आलं. यानंतर सैन्य सतर्कतेवर आहे.
देशात पहिल्यांदा ड्रोन हल्ला
दोन दिवसांपूर्वी शनिवार आणि रविवारी मध्यरात्री जम्मू हवाई दल स्टेशनवर दोन ड्रोन स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात हवाई दल स्थानकाच्या छताचं नुकसान झालं आणि दोन सैनिकही जखमी झाले. ड्रोनद्वारे एअरबेसच्या आत दोन आयईडी टाकण्यात आले. नुकसान जास्त नव्हते. अशा प्रकारचा हा पहिला हल्ला होता. हे दोन्ही स्फोट शनिवारी रात्री दीड ते दोन दरम्यान घडले. भारतीय विमानाजवळच हा स्फोट झाला. हे स्थान आंतरराष्ट्रीय सीमेपासून १४ किलोमीटर अंतरावर आहे.
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटलंय. या हल्ल्यानंतर थोड्याच वेळात एका लष्कर दहशतवाद्याला ६ किलो स्फोटकांसह अटक करण्यात आली.
हवाई दलाचे माजी उपाध्यक्ष एअर मार्शल रविकांत शर्मा मानतात की, “दहशतवादी हल्ल्यांमध्ये ड्रोनचा वापर चिंताजनक आहे. ड्रोनच्या बाबतीत सर्वात मोठी समस्या ही आहे की, छोट्या आकारामुळं आणि कमी उड्डाणमुळं ते रडारनं पकडले जात नाहीत. जेव्हा आपण अगदी जवळ जाता तेव्हा ते पाहिले जाऊ शकते. यामुळंच ड्रोनच्या बाबतीत ‘शूट टू किल’ या एसओपीचा अवलंब केला जातो.”
“यासाठी अमेरिका आणि इस्राईल क्षेपणास्त्रांचा वापर करतात. ड्रोन हल्ले थांबविण्यात आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. ड्रोनची श्रेणी ५ ते १०० किमी पर्यंत आहे. हे ड्रोनच्या पेलोडवर अवलंबून आहे. ड्रोनच्या तुकड्यांवरून हे समजते की ज्या ठिकाणावरून त्यांनी उड्डाण घेतले होते त्याचा अंदाज येतो.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे