मुंबईत हवेत उडणारी डबल डेकर बस चालवण्यासाठी प्रयत्न- नितीन गडकरी

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२२ : गतिमान विकासाच्या नवनवीन योजना राबवणाऱ्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईसाठी एक नवीन योजना प्रस्तावित असल्याचे सूचित केले. मुंबईत भेडसवणारी वाहतूक कोंडीची समस्या आणि प्रवासी संख्या डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये डबल डेकर हवेत उडणारी बस चालू करण्याच्या मानस प्रस्तावित असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. भविष्यकाळाचा वेध घेता मुंबईमध्ये हवेत उडणारी डबल डेकर बस पाहिजे, यावर अभ्यास सुरू असल्याचे आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना नितीन गडकरींनी सांगितले. पवई ते नरिमन पॉईंट असा मुंबईकरांचा हवेतून प्रवास होणार आहे.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा वापर करायला पाहिजे. बंगळुरुमध्ये एवढी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण आहे की, मी तेथील मुख्यमंत्र्यांना सांगितले, आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झाले. हवेत उडणारी डबल डेकर बस, मुंबईत अशीच पाहिजे, ती बनवण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. २०० च्यावर लोक हवेतून प्रवास करतील.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, पवईतून डोंगराच्या वरुन निघून नरीमन पॉईंटला वरच्या वर हवेतून जाऊन, नागरिकांचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल, वाहतूक व्यवस्थेत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे. दरम्यान, पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी हवेतून उडत्या बसचा पर्याय सुचविला होता. यासाठी केंद्र सरकार निधी देइल महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, असे त्यांनी सांगितले होते.

हवेत उडणारी बस, रोप-वे कार, टोलनाके कायमचे बंद, यासारख्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे नितीन गडकरी नेहमीच चर्चेत असतात. काळाच्या पुढची पावले ओळखून काम करणारे, जलदगती निर्णय घेणारे द्रष्टे मंत्री म्हणून ते ओळखले जातत यामुळे त्यांची विकासाची दूरदृष्टी ही दिसून येते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा