अत्याचारात शिक्षेची जलद अंमलबजावणी गरजेच : अ‍ॅड. निकम

अहमदनगर : अत्याचारात शिक्षेची जलद अंमलबजावणी होणं गरजेच आहे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी अ‍ॅड. निकम म्हणाले की, नगरमध्ये खटल्याच्या कामकाजासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
अ‍ॅड. निकम म्हणाले की, अत्याचाराच्या गुन्ह्यातील शिक्षा देण्याचा हेतूच सफल होत नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचारात वाढ होत चालली आहे. असे खटले जलदगती न्यायालयात चालवून उपयोग नाही. खटल्यांवरील शिक्षेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच अशा घटनांना चाप बसेल.
महिलांवरील वाढत्या अत्याचारांचे प्रमाण हे दुर्दैवी आहे. या घटना दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत चालल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर समाजात त्याचा तीव्र पडसाद उमटतात.
सरकार देखील त्याची सुरूवातीला गंभीरपणे दखल घेते. असे खटले जलदगती न्यायालयात चालविले जातात. आरोपींनी शिक्षा दिले जाते.
दरम्यान, परंतु, ज्यावेळी शिक्षेवर अंमलबजावणीची वेळ येते त्यावेळी कायद्याचा आणि नियमांचा आधार घेत पळवाटा शोधल्या जातात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा