जम्मू काश्मीर: सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारच्या दंगली किंवा जमाव, दगडफेक यांसारखे प्रकार घडले नसल्याचे स्पष्ट केले होते. आकडेवारीचे विश्लेषण दर्शविते की जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत दरमहा सरासरी ५० दगडफेक किंवा कायदा व सुव्यवस्थेच्या भंग करण्याच्या घटना घडल्या. ५ ऑगस्टनंतर दरमहा सरासरी ५५ अशा घटना वाढल्या.
केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) मंगळवारी संसदेत सांगितले की, जम्मू-काश्मीर मध्ये ऑगस्टनंतर दगडफेक व कायदा व सुव्यवस्थेच्या भंग करण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तथापि, सरकारने पुरविलेल्या आकडेवारीवरून अशा घटनांमध्ये किरकोळ वाढ दिसून येते.