औंध मुस्लिम कब्रिस्तान मध्ये विविध विकास कामे

पुणे, औंध प्रतिनिधी: मुस्लिम कब्रिस्तान याठिकाणी माननीय नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या विकास निधीतून तीस लाखाचे विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. या विकास कामांचे यंदा हे तिसरे वर्ष आहे. दरवर्षी येथे दहा लाख याप्रमाणे विकासकामे करण्यात आली आहे.

आज कब्रिस्तान मधील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये कब्रिस्तान चा अंतर्गत मार्ग, रात्रीच्या प्रकाश व्यवस्थेसाठी लाईट पोल, संरक्षक भिंत, तसेच इतर दुरुस्ती विषयक कामे यांचा समावेश आहे. याआधी देखील या निधीमधून या प्रकारची विकासकामे येथे करण्यात आली आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी स्थायी समिती सदस्य विद्यमान नगरसेवक बंडू उर्फ प्रकाश ढोरे, क्रीडा समितीचे अध्यक्ष माननीय विजय शेवाळे, माजी महापौर सुरेश दादा शेवाळे, महाराष्ट्र शासन सदस्य महाराष्ट्र राज्य, विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य आनंद विनायक जुनवणे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर औंध मुस्लिम कब्रस्तान चे अध्यक्ष याकूब जाफर सय्यद, उपाध्यक्ष अल्लाउद्दीन मोहम्मद पठाण, ट्रस्ती अकबर इस्माईल शेख, नूर मोहम्मद शेख, खन्ना वजीर मुलानी, फय्याज आतिफ खान,हाफिद जाफर सय्यद, इक्बाल हमीद मनियार आधी सदस्य उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा