औरैया अपघातात: मृत्यू झालेल्या मजुरांची संख्या २५ वर

उत्तर प्रदेश, दि. १७ मे २०२०: उत्तर प्रदेशमधील औरैया येथे रस्ता अपघातात मृतांचा आकडा २५ झाला आहे. शनिवारी सकाळी औरैया येथील डीसीएम येथून घरी परत येत असलेले हे कामगार एका अपघातात बळी पडले. यात अनेक कामगार जखमीही झाले, ज्यांचे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीएम मोदी यांनी ट्वीट करून औरैया दुर्घटना शोकांतिका असल्याचे सांगत, म्हटले आहे की सरकार मदतकार्यामध्ये व्यस्त आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या परप्रांतीय मजुरांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करीत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. तसेच जखमींना पंतप्रधान मदत निधीतून ५०-५० हजार रुपये दिले जातील.

त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अपघाताबद्दल ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्वीट केले होते की औरैया येथे झालेल्या रस्ते अपघातात अनेक कामगारांच्या मृत्यूबद्दल त्यांना फार वाईट वाटले. ज्यांनी या अपघातात प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेल्या मजुरांची तब्येत लवकरच बरी व्हावी अशी शुभेच्छा त्यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा