औरंगाबाद जिल्ह्यातील मक्याला मिळणार हमीभाव

औरंगाबाद, दि.२४ मे ,२०२० : औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याचे पीक होते. सुरुवातीला मक्यावर लष्करी अळीचे आक्रमण झाले. त्यामधून कसेबसे वाचलेल्या मका पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. उत्पादित मका बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे. उत्पादित मक्याला किमान आधारभूत दर मिळावा, यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांच्या उपस्थित झालेल्या कृषी आढावा बैठकीत मका उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा अतिशय मुद्देसुदपणे मांडून मका पिकाला हमीभाव देण्याची मागणी केली होती.

या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी मागणीला पाठिंबा देऊन समर्थन केले. या मागणीचे शासन स्तरावर योग्य दखल घेऊन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, लासूर, वैजापूर, पैठण, कन्नड, खुलताबाद, करमाड व फुलंब्री या दहा ठिकाणी हमीभावने खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे.

या केंद्रावर मका उत्पादकांना ऑनलाइन नोंदणी व नोंदणी केलेल्या मका उत्पादकांकडून मकाच्या खरेदी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश दिले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा