औरंगाबाद, १० जानेवारी २०२३ : शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण संस्था समनव्य संघाच्या माध्यमातून औरंगाबाद (मराठवाडा विभाग) शिक्षक मतदारसंघ निवडणूक- २०२३ साठी मा. प्रा. मनोज शिवाजीराव पाटील हे मंगळवारी (ता. दहा) सकाळी अकरा वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पैठण गेट, निराला बाजार, भडकल गेट, अण्णा भाऊ साठे चौक येथून मिरवणुकीद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सर्व मित्रपरिवाराने, मंगळवारी सेंट फ्रान्सिस स्कूल, जालना रोड येथील मैदानावर उपस्थित राहावे, अशी विनंती प्रा. मनोज पाटील यांनी केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील











































