औरंगाबादचे “संभाजीनगर” उस्मानाबादचे “धाराशीव” नवी मुंबई विमानतळला दि.बा.पाटलांचं नाव, शिंदे-फडणवीस सरकारचे नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई, १६ जुलै २०२२: महाविकास आघाडी सरकारने अल्प मतात असतानाही घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकारने तीन महत्वाचे निर्णय पुन्हा नव्याने घेतले आहेत. २९ जुन रोजी झालेले निणय हे घटनाबाह्य आणि घाईगडबडीत घेण्यात आले होते. त्यामुळे लोकशाहीला ते मान्य नव्हते.

आता पुन्हा मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने तीन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये औरंगाबाद “संभाजी नगर” उस्मानाबादचे “धाराशिव” असे नामांतर करण्यात आले आहे. तर नवी मुंबई विमानतळला दि. बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे. दि.बा.पाटील यांच्या भूमिपुत्रांसाठीचे योगदान पाहून हे नाव देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

त्यामुळे जरी महाविकास आघाडी सरकारच्या काळातले असले तरी त्यांची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. लोकशाहीत बहुमताला मोठे महत्त्व आहे. आणि आता आमच्याकडे पूर्ण बहुमत असल्याने या निर्णयावरच शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

आता हा ठराव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्राकडे पाठविला जाणार आहे. शिवाय याला मंजुरी मिळणार असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा