औसा तालुक्यातील गावांचा खा. ओमराजेंनी घेतला आढावा.

लातूर, १३ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन वाढवण्यात आलेले आहे. काही शहरांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू केलेली आहे. तर, अशा परिस्थितीत प्रशासन रात्रंदिवस कार्यरत राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लातूर जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच चालला आहे. या कारणामुळे, लातूर जिल्ह्यातील औसा तालुका मधील गावांना खा. ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीत जाणून घेतली.

औसा तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या गावांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी भेट दिली. गावांमधील नागरिकांशी चर्चा करून गावातील परिस्थिती जाणून घेतली. तसेच, कोरोना विषाणूच्या संसर्ग थांबावा आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. यामुळे गावातील प्रत्येक कुटूंबाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप केले.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात प्रशासन जनतेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरी, या परिस्थितीमध्ये तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मास्क किंवा रूमालचा वापर करावा, सॅनिटाइजरचा वेळोवेळी वापर करावा, आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या काळात घाबरून जाऊ नये तर स्वत:ची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गावांतील सर्व नागरिकांना केले. या सोबतच, कंटेन्मेंट भागातील नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी प्रशासकिय यंत्रणेस दिल्या आहेत.

औसा तालुक्यातील गावांचा आढावा घेताना त्यांच्यासोबत किल्लारी शहरप्रमुख किशोर जाधव, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी श्री. भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर आर शेख, सपोनि श्रीरामवाड, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा