गोल पोस्ट गुन्हा औषध स्प्रे मारून ८० हजार लांबविले

औषध स्प्रे मारून ८० हजार लांबविले

अहमदनगर : राहुरी कारखाना येथील स्टेट बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणास गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून ८० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी कारखाना येथे फिटर काम करणारे तरुण दत्तात्रय निवृत्ती होले हे दुपारी स्टेट बँकेत ८० हजार रुपये भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन अनोळखी चोरट्यांनी दत्तात्रय होले यांच्यावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर होले यांना काहीच न सुचल्याने पुरते गांगरून गेले. त्याचवेळी अनोळखी चोरट्यांनी होले यांच्या जवळील ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
काही वेळानंतर औषधाच्या गुंगीतून बाहेर आल्यानंतर होले यांनी घटनेची माहिती आपल्या मित्रास कळविली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत राक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन बँकेचे सीसीटीव्ही तपासले.

error: Content is protected !!
Exit mobile version