अवघ्या ५५ सेकंदाचा “आळंदी पॅटर्न” आला अंगलट

पुणे : सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. मात्र ते करत असताना ते किती महागात पडू शकता याचा प्रत्यय आळंदीतील युवकांना आला आहे. बऱ्याचवेळा व्हिडीओ तयार करताना शस्त्रांचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळतं. मात्र, शस्त्रात्र कायद्याखाली हा गुन्हा आहे.

याबाबत एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, देवाच्या आळंदीत उगवत्या स्टार्सनी तलवारी अन् कोयते नाचवत अवघ्या ५५ सेकंदात ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार रंगवला.त्यांनी टिकटॉकवर बनविलेले दोन व्हिडीओ त्यांच्या चांगलेच अंगलट आलेत. याप्रकरणी सहा उतावळ्या स्टार्सना आळंदी पोलिसांनी चांगलीच तुरुंगाची हवा खायला लावली. आळंदी पोलिसांनी ही कारवाई केली.

मुळशी चित्रपटात जे घडलं तेच या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रीकरण केलं. ‘तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या म्हटल्यावर, आम्ही तुम्हाला खाणारच ना?’ हा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे. त्यालाच अनुसरुन या उगवत्या स्टार्सनी ‘आळंदी पॅटर्न’ साकारला. आधी आयटी इंडस्ट्रीसाठी जमिनी गेल्या. यातून भाईगिरीचा उदय झाला, हफ्तेखोरी, खंडणी सुरू झाली. एका भाईला संपवून दुसऱ्या भाईचा उदय झाला अन् नंतर त्याचाही कसा अंत झाला हे मुळशी पॅटर्नमध्ये आपण पाहिलं. याचं चित्रीकरण पुण्याच्या मार्केटयार्ड आणि मुळशी भागात झालं. त्यामुळे या ‘आळंदी पॅटर्न’ मध्ये आळंदीमधील बाजारपेठ अन् अर्धवट बांधकामांचा आधार घेण्यात आला.
अवघ्या ५५ सेकंदात त्यांनी “आळंदी पॅटर्न” यांनी साकारला.
दिवसा झालेल्या या चित्रीकरणात नंग्या तलवारी अन कोयते हे नाचवण्यात आल्यात. आळंदी पॅटर्नमध्ये तीस सेकंदानंतर इंटरवल असून उर्वरित भाग हा पंचवीस सेकंदाचा आहे. या अवघ्या ५५ सेकंदात ‘आळंदी पॅटर्न’ साकारण्यात आलाय. टिकटॉकचे हे दोन भाग परिसरात व्हायरल झाले. अवघ्या पंचावन्न सेकंदात अख्खा चित्रपटाचा थरार पाहून आळंदी पोलिसांना मोठा धक्का बसला.
त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवली अन् नको ती किमया साधणाऱ्या उगवत्या सहा स्टार्सना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यापैकी तिघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तेव्हा उगवत्या स्टार्सनी टिकटॉकवर व्हिडीओ बनवताना काळजी घ्या, अन्यथा तुमची वरात थेट तुरुंगात जाईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा