अविनाश भोसलेंची १६४ कोठी तर संजय छाब्रिया यांची २५१ कोटींची संपत्ती जप्त, येस बँक घोटाळा प्रकरणी कारवाई

पुणे, ०३ ऑगस्ट २०२२: प्रसिद्ध उधोजक अविनाश भोसले यांची १६४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे‌. तर संजय छाब्रिया यांची २५१ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे‌. दोघांची मिळून ४१५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे‌. येस बँक घोटाळ्यात आतापर्यत १८२७ कोटींची मालमत्ता जप्त केली गेली आहे.

अविनाश भोसले यांचा मुंबईतील ड्युफ्लेक्स फ्लॅट जप्त केला आहे. तर छाब्रिया यांची बंगळुर आणि सांताक्रुझमधील जमीन, सांताक्रुझ मधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त करण्यात आलेत. दोन दिवसांआधी सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केले होते.

मनी लॉन्डरिंग प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे‌. काही दिवसांपासून त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरु होता. सीबीआयकडून अनेकदा त्यांची चौकशी झाली होती. तसेच त्यांना अटकही झाली होती. याच प्रकरणात त्यांच्या कुटंबीयांची चौकशी करण्यात आली होती.

आता हे प्रकरण दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढवताना दिसताहेत. यात आणखी काही महत्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा