पुणे, दि. २२ जुलै २०२०: शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा म्हणवून घेतो खरा पण तेवढ्यापुरताच तो मर्यादीत राहतो. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा प्रत्येक राजकारण्याला यांचा पुळका येतो. मात्र त्यानंतर काय? आजही शेतकरी हा जगाचे पोट भरतो पण स्वतः उपाशीच झोपतो हि वास्तविकता नाकरून चालणारी नाही. याला जवबदार कोण ?
कोरोनाने जगाला वेठीस तर धरले होतेच पण आधीच आयुष्याने वेठीस धरलेल्या शेतकऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात याचा घाला बसला. बळीराजाचे यंदाचे पिक चांगले आले पण कोरोनाने मात्र सगळे पाणी फिरवले. संताप येणं स्वाभाविक आहे. लाखो एकरावरांच्या फळं, भाज्या, धान्य यावर नांगर फिरवला. पण ते एक शेतकरी म्हणून योग्य कृत होते का? कारण काही शेतक-यांनी हेच सर्व फळं,भाज्या, धान्य काढून मोफत गावात वाटप केले तर अनेक गरीबांना यांच्या या वटपाचा आधार मिळाला मग ते दानशूर शेतकरी सगळेच होऊ शकले आसते. वर आभाळाकडे नजर खाली जमिनीला भेगा पण खचून न जाता पीक काढणारा शेतकरी न्यायासाठी हे नासाडी आदोंलन करतोय हे योग्य आहे ?
सध्या सबंध महाराष्ट्रात दुध दर वाढी आंदोलनाचा भडका उठलेल्या आपण पाहिले. यात अनेक संघटना, पक्ष, शेतकरी हे रस्त्यावर उतरले खरे पण आंदोलन झाले कसे? दुध एक असा पदार्थ जो एका मातृत्वातून दुसऱ्या मातृत्वाच्या बाळाचे पोषण करते, कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती खबरदारी म्हणून हळदी घालून कुंटूबासमावेत आज पितो आणि जसे प्रेमातील नाते दोघांशिवाय संपुर्ण होत नाही अशा चहाची चव देणारा दुध, प्रत्येकाच्या आयुष्यातील सकाळच्या चहा पासून ते रात्री झोपेच्या वेळेत काढा म्हणून वापरण्यात येणारे हजारो लीटर दुधाचे टँकर आडवत काही लोकांनी आदोंलनाच्या नावे रस्त्यावर दुधाच्या नद्या वाहिल्या आणि पळून गेले. हे असे जाणारे शेतकरी होते का? हे कृत्य एका ठिकाणी नसून राज्यातील विविध शहरात असे दुध रस्त्यावर सोडून वाहून देण्यात आले? का?असे कृत्य शेतकरी करणार नाही कारण त्या गयीच्या दुधाचा दाम जरी आज त्या बळीराजाला कमी मिळत असेल पण त्या गायीच्या मातृत्वाच्या दुधाची जाणीव मात्र त्या बळीराजाला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे तो आसे कृत्य करणार नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
“ईडा पिडा टळू दे अन् बळीचे राज्य येऊ दे”.
वर्ष वर्ष शेतात राबत आपली कसलीच हौस न करता कुंटूबापेक्षा आपल्या मातीमायला, गायी म्हशी, बैलं अशा पोरांना संभाळणारा बळीराजा एव्हढा अक्रमक कसा झाला? आणि याला जवाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर हे प्रशासना बरोबर कुठेतरी आपल्यातच दडून बसले आहे. याचा शोध प्रत्येकांने घेत संकल्प केला पाहीजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी