महावितरणाविरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

बारामती, ५ फेब्रुवरी २०२१: थकीत वीजबिल वसुलीबाबत राज्यशासनाने अवलंबलेल्या धोरणाचा निषेध व्यक्त करत बारामती मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी सरकारचा जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आधीच शेतकरी निसर्गाच्या प्रकोपाणे ग्रस्त आहे. आता सरकारने मनमानी पद्धतीने वीजबिल आकारणी केली आहे.तर शासनाने ७२ लाख वीज ग्राहकांचा विज पुरवठा तोडून सक्तीने वीज वसुलीचा निर्णय घेतला आहे.या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बारामती महावितरणच्या ऑफिसला कुलूप लावून टाळा ठोको आंदोलन करण्यात आले व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सुरेंद्र जेवरे, अक्षय गायकवाड, जी.के.देशपांडे, अल्लाताफ बागवान, सचिन मोरे, शरद भगत, मुकेश वाघेला,संजय रायसोनी, अभिजित पवार, संजय दराडे उपस्थित होते.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा