वाढदिवसाचा खर्च टाळून विविध समाजिक उपक्रमांचे आयोजन

इंदापूर, दि. १८ जून २०२०: समाजाप्रती असणारी व्यक्तीची आस्था हिच त्याला खरा समाजसेवक मानत असते. या समाजसेवकाचे आपल्या कार्यातील सातत्य त्याला लोकांच्या जीवाभावाचा व हक्काचा माणूस बनवते आणि लोक निःसंकोचपणे आपल्या अडीअडचणी घेऊन न्याय मागण्यासाठी या व्यक्तीकडे जातात.

हा प्रवास तसा खूप मोठा आहे. पण समाज कार्यातील आपल्या सातत्याने हा प्रवास पूर्ण करत इंदापुरकरांच्या मनात माजी सभापती प्रवीण माने यांचे व्यक्तिमत्व चांगलचं रुजलय.

संपुर्ण इंदापूर तालुक्यातील सहकारी मित्रांनी माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत तो दिवस समाजोपयोगी बनविला. माने यांच्या मित्र परिवाराच्या वतीने प्रविणभैय्या माने युवामंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बरेच समाजिक उपक्रम पार पडले.

संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना सारख्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आज सबंध देशभरात केलेल्या लॉकडाऊन मुळे देशासह, राज्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्य शासनाने रक्तदान करून ही तूट भरून काढण्याचे प्रत्येकाला आव्हान केले. हे आव्हान स्विकारत प्रविण माने यांनी आपल्या सहकारी व मित्रपरिवाराच्या साथीने इंदापूर तालुक्यात रक्तदानाची मालिकाच सुरू केली. या शिबिरातून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करत करण्यात आले.

प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने प्रविणभैय्या माने युवामंच तसेच श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट महा राज्य, लोकसेवक गणपतराव आवटे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याविषयी सांगत असताना प्रविण माने यांनी आपल्याला या रक्तदानाची व्याप्ती वाढवत ७५०० बाटल्यांचे रक्तसंकलन राज्याच्या रक्त पेढीत करायचा मानस आपण बाळगला असल्याचे त्यांनी सांगतिले.

आत्तापर्यंत सबंध तालुक्यातून घेण्यात आलेल्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर ३३०० रक्त दात्यांनी आपला रक्तदानाचा पवित्र हक्क बजावला असल्याचे प्रविण माने यांच्यावतीने सांगण्यात आले. आत्तापर्यंत रुई, भांडगाव , भाटनिमगाव, गोतोंडी, पंधारवाडी, बेलवाडी, पळसदेव, बाभूळगाव, कांदलगाव, मानेवस्ती, गलांडवाडी नं. २, बोराटवाडी, लुमेवाडी, माळवाडी नं.१, कुरवली, सपकळवाडी, भवानीनगर, डाळज.२, व्याहळी, भोडणी, कळंब, पोंधवडी या गावांतून रक्तदान शिबिरातून पार पडले असून लवकरच इतर गावांतूनही हि शिबिरं पार पडतील.

इंदापूर तालुक्यातील पिंपळे येथे जन्मदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे येथील या वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रदीप गायकवाड मित्र परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. काळाची गरज ओळखत पिंपळे येथे घेण्यात आलेला हा कार्यक्रम अतिशय गौरवास्पद असून प्रत्येकानं वृक्षारोपणासाठी कटीबद्ध राहत आपली नैतिक जबाबदारी समजून घ्यावी हे विचार मांडत माने यांनी स्वःता वृक्षारोपण करत इतरांनाही हा थोर कार्य करण्यास उद्युक्त केले.

याचसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या स्वास्थ्याचा विचार करत. आयुष मंत्रालयाच्यावतीने सुचविण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे इंदापूर शहरातील – आठभाई मळा व लोकमान्य नगर, मुकबधिर शाळा इंदापूर, तसेच माळेवाडी, इंदापूर, माळवाडी नं.२, तरडगाव, गोतोंडी, भांडगाव, पंधारवाडी, रुई, पळसदेव, भाटनिमगाव, हिंगणगाव, तरटगाव,नरुटवाडी, सातपुतेवस्ती या भागातून वाटप करण्यात आले.

याशिवाय नागरिकांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा विचार करत प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने इंदापूर शहरातील विचारमंथन परिवारातील सर्व सदस्यांना मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याविषयी सांगताना माताभगिनी – वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद व सहकारी मित्रांची सोबत याच ताकदीवर मी या सगळ्या गोष्टी करू शकलो, व भविष्यातही करतच राहिन असे मत प्रविण माने यांनी न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा