आवाजाचा जादूगार “मोहम्मद रफी”

हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक. मोहम्मद रफ़ी हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताबाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत.

मोहम्मद रफी हिंदी आणि मराठी आणि अन्य भाषांमध्ये गायकीसाठी प्रसिद्ध असलेले एक अजरामर नाव. ज्यांनी आपल्या आवाजाच्या जादूने संपूर्ण जगाला भुरळ घातली. अशा सुंदर व्यक्तिमहत्वाचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी कोटला, सुलतान सिंह येथे झाला. हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी, उर्दू, पंजाबी, मराठी, तेलगू आदी भाषांमधून गाणी गायली. परंतु त्यांची हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते.३१ जुलै १९८० रोजी त्यांचा मुंबई येथे मृत्यू झाला.

मोहम्मद रफींंनी गायलेली पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली, शोधिसी मानवा राउळी मंदिरी, हे मना आज कोणी बघ तुला साद घाली, हा छंद जिवाला लावी पिसे विरले गीत कसे,अगं पोरी संभाल – कोळीगीत, प्रभू तू दयाळु कृपावंत दाता , हसा मुलांनो हसा, हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, नको भव्य वाडा, माझ्या विरान हृदयी, खेळ तुझा न्यारा, प्रभू रे, नको आरती की पुष्पमाला ही मराठी गाणी विशेष प्रसिद्ध आहेत.
याशिवाय हिंदीतील ये रेशमी जुल्फे, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, विनोद मेहेरा, धर्मेंद्र, यांच्यावर चित्रित केलेली गाणी अजरामर आहेत. आजही ती गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशा महान गायकाला शतशः प्रणाम.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा