गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व संकल्प सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने बक्षीस समारंभ

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व संकल्प सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने बक्षीस समारंभ

हडपसर, दि. ०६ सप्टेंबर २०२०: हडपसर येथे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस, व संकल्प सामाजिक सेवा संस्था, यांच्या वतीने गणेशोत्सव काळात गौरी गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आज बक्षीस समारंभ करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर छोट्या स्वरूपात कार्यक्रमात करण्यात आला होता.

गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे

प्रथम क्रमांक- मोघे परिवार
द्वितीय क्रमांक – भुजबळ परिवार
तृतीय क्रमांक – कासार परिवार

यावेळी प्रमोटर्स अँड बिल्डर्स गणेश घुले, रा. कॉ. हडपसर विधानसभा म. सं. उपाध्यक्ष राजेंद्रदादा घुले, रा. यु. कॉ. पुणे शहर युवक उपाध्यक्ष उमेश कोंढाळकर, आप्पेश घुले, परशुराम शरणागत, नितीन तरवडे, बाळासाहेब चव्हाण, सचिन कांबळे, संजय वाडकर संतोष गोरे, संजय वाडकर उपस्थित होते.
सहभागी सर्व स्पर्धकांचे आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेस व संकल्प सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

न्यून अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version